*जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.* 😊 मी एक शिक्षक आहे! आपण कोणासही सांगून बघा. त्यांच्या भुवया कौतुकानं उंचावतात. थोडा हेवा वाटतो. काश! मै भी टिचर होता। 😊 येतंच त्यांच्या मनात. का येऊ नये. इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्या नशीबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस देवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आपण मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासातील दिवस अधूनमधून कायम आठवतात. 🥰 वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि.... दिवस इकडचा तिकडं कधी होतो कळतही नाही. मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो. *मी शाळेत आहे... शाळेत जात आहे..... हे सांगणं किती मस्त वाटतं.* 🥰 मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायम जातो. *मलाही मुलांसारख्या सुट्या असतात. माझ्या वर्गाने सामना जिंकला की मीही उड्या मारतो किंवा मारते.* विशेष दिवस असतील तर मुलांप्रमाणे आम्हीही नटतो. *एकदम.... क ssडssक.* 👍 एकंदरीत काय तर.... शाळा आम्हाला कायम ताजी ठेवते. आमची कायम सदाफुली होते. इतरांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचं त...