*कसं आहे ना?*
एक कागदाचं
पान असतं.
*'श्री'* लिहलं की
पुजलं जातं.
*प्रेमाचे* चार शब्द
लिहले की
जपलं जातं.
काही *चुकीचं*
आढळलं की
फाडलं जातं.
एक कागदाचं
पान असतं.
कधी त्याला
*विमान* बनवुन
भिरकावलं जातं.
कधी *होडी* बनवुन
पाण्यात सोडलं जातं.
कधी *भिरभिर* बनवुन
वाऱ्यावर फिरवलं जातं.
आणि कधी तर
*निरुपयोगी* म्हणुन
चुरगाळलही जातं.
एक कागदाचं
पान असतं.
जे लेखकाच्या
*लेखणीला* हात देतं.
जे चित्रकाराच्या
*चित्राला* साथ देतं.
जे व्यापाऱ्याच्या
*हिशोबाला* ज्ञात ठेवतं.
आणि हो,
वकीलासोबत *कोर्टात* गेलं,
की *साक्षही* देतं.
एक कागदाचं
पान असतं.
*पेपरवेट* ठेवलं की
एकदम गप्प बसतं.
काढून घेतलं की
*स्वच्छंदी* फिरतं आणि
कशात अडकलं तर
*फडफडायला* लागतं.
एक कागदाचं
पान असतं.
ज्यावर बातम्या छापल्या,
की *वर्तमानपत्र* बनतं.
प्रश्न छापले की
*प्रश्नपत्रिका* बनतं.
विवाहाचं निमंत्रण छापलं,
की *लग्नपत्रिका* बनतं.
तर कधी आदेश~संदेश
लिहले की तेच *टपालही*
बनतं.
एक कागदाचं
पान असतं.
*माणसाच्या* जीवनात
आणि *त्यात* खुप
*साम्य* असतं.
एक कागदाचं
पान असतं.
जन्माला आला तर Birth Certificate असतं
निधन झाला तर Death Certificate असतं
एक कागदाचं
पान असतं.
🙏🌹जय श्री कृष्ण 🌹🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा