*कसं आहे ना?* एक कागदाचं पान असतं. *'श्री'* लिहलं की पुजलं जातं. *प्रेमाचे* चार शब्द लिहले की जपलं जातं. काही *चुकीचं* आढळलं की फाडलं जातं. एक कागदाचं पान असतं. कधी त्याला *विमान* बनवुन भिरकावलं जातं. कधी *होडी* बनवुन पाण्यात सोडलं जातं. कधी *भिरभिर* बनवुन वाऱ्यावर फिरवलं जातं. आणि कधी तर *निरुपयोगी* म्हणुन चुरगाळलही जातं. एक कागदाचं पान असतं. जे लेखकाच्या *लेखणीला* हात देतं. जे चित्रकाराच्या *चित्राला* साथ देतं. जे व्यापाऱ्याच्या *हिशोबाला* ज्ञात ठेवतं. आणि हो, वकीलासोबत *कोर्टात* गेलं, की *साक्षही* देतं. एक कागदाचं पान असतं. *पेपरवेट* ठेवलं की एकदम गप्प बसतं. काढून घेतलं की *स्वच्छंदी* फिरतं आणि कशात अडकलं तर *फडफडायला* लागतं. एक कागदाचं पान असतं. ज्यावर बातम्या छापल्या, की *वर्तमानपत्र* बनतं. प्रश्न छापले की *प्रश्नपत्रिका* बनतं. विवाहाचं निमंत्रण छापलं, की *लग्नपत्रिका* बनतं. ...